सोशल मीडिया : एक अभिवक्ती विषय केतकीच्या पोस्ट विषयी...

    गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर केतकी चितळे ला मोठया प्रमाणात ट्रोल केलं जातं आहे..सोशल मीडियावर तिचा प्रसिद्ध झालेला व्हिडीओ आणि त्याच्यावर आलेल्या कमेंट्स... या दोन्ही गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत..
    एखाद्या स्त्रीने आपलं मत व्यक्त केल्या नंतर तिला अशा घाणेरड्या आणि खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल केलं जातं.. ही बाब खरंच खूप गंभीर आहे...
    आजकाल काही लोकं सोशल मीडिया वर कमेंट करताना, पोस्ट करताना बऱ्याचदा तारतम्य बाळगत नाहीत..(अर्थात त्यात लाईक किंवा फॉलो ची अपेक्षा असु शकते..) कालपर्यंत इनबॉक्स किंवा पर्सनल चॅट मध्ये घडणाऱ्या (मुद्दाम केल्या जाणाऱ्या गोष्टी) आज सर्रासपणे 'सोशल अभिवक्ती' च्या नावाखाली ट्रोल म्हणून केल्या जाऊ लागल्या आहेत.. यात समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेचा विचार अजिबात केला जात नाही, हेच केतकी चितळे च्या प्रकरणावरून सिद्ध झाले आहे...
    सोशल मिडिया हे सामाजिक अभिव्यक्ती चे माध्यम आहे, कुणाला दुखावण्याचे नाही...
    एक क्षणासाठी केतकीच्या जागी आपण स्वतःच्या बहिणीला ठेवूया आणि मग अशा कमेंट आपण लिहू शकतो का..?! याचा विचार करूया...
    तेव्हा आजपासून आपण सगळ्यांनी एक शपथ घेऊया- "मी सामाजिक माध्यमांचा चुकीचा वापर करणार नाही आणि कुणाला करू ही देणार नाही.."
    assinar petição
    assinar petição
    O seu JavaScript está desativado. Sem ele, nosso site pode não funcionar corretamente.

    política de privacidade

    ao assinar, você aceita o termos de serviço da Care2
    Você pode gerenciar suas assinaturas de e-mail a qualquer momento.

    Está tendo algum problema?? Avise-nos.