वनवासी शब्द वापरल्यास अट्रोसिटी लावा..

भारतातील आदिवासी समाज हा मूळ समाज आहे. हा समाज खऱ्या अर्थाने या देशाचा मालक आहे. वनवासी बोलून त्यांच्या अस्मितेचाच प्रश्न उभा केला जात आहे. वनवासी म्हणजे वनात राहणारी लोकं. पण आदिवासी समाज हा खूप मोठा समाज आहे तो फक्त जंगलात किंवा वनात राहणार नाही. त्यामुळे त्यांना वनवासी बोलून फक्त जंगलापूरता सीमित करणे चुकीचे आहे.

आज ज्या पद्धतीने त्यांची अवस्था केली जात आहे याला जबाबदार कोण आहे?? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सोयी सुविधा पण त्यांना मिळत नाहीत. त्यांना वनवासी बोलून त्यांच्या मूळ अधिकारापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिवसेंदिवस परिस्थिती आणखी खालावत चालली असून त्यांचे जंगल, जमिनी आणि आता तर त्यांचे अधिकार देखील नाकारले जात आहेत. त्यांच्यावरील होणाऱ्या शोषणाच्या विरोधात त्यांच्या न्याय हक्कांसाठी आपण उभे राहिले पाहिजे. त्यासाठी आपण आदिवासी समाजाच्या अस्मितेची लढाई लढत आहोत..

ईतर मागासजातीय इंकलाब संघटनेच्या वतीने आपणास ही भूमिका पटली तर नक्की आपली सही नोंदवा.. १लाख सह्या घेऊन सरकारला याचा अहवाल पाठविण्यात येणार आहे.

आपली,
विजेता भोनकर
अध्यक्षा
ईतर मागासजातीय इंकलाब(ईमाइ)

Signera petitionen
Signera petitionen
Du har JavaScript inaktiverat. Utan den skulle vår webbplats inte fungera korrekt.

sekretesspolicy

genom att skriva under accepterar du användarvillkor för Care2
Du kan hantera dina epostabonnemang när som helst.

Har problem med att skriva under detta? Låt oss veta.