Justice for Avni, the fearless tigress

"अवनी" ही एक उमदी वाघीण आपल्या दोन 8/9 महिन्यांच्या बछड्या सोबत महाराष्ट्रातील , यवतमाळ, येथील जंगलात राहात होती। सगळं छांन चाललं होतं। पण मागील एक वर्षा पासून तिच्या वर ' नरभक्षक' हा शिक्का मारला गेला। कुठलाही ठोस पुरावा नसताना। शेवटी तिला दि.2 नोव्हेबेर रोजी , शफत अली व असगर अली , ह्या दोन भाडोत्री गुंडा करवी ठार मारण्यात आले। कुठलेही protocols पाळण्यात आले नाहीत। राज्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ह्यांच्या आदेशाअनुसार ' मिश्रा' ह्या वन अधिकाऱ्याने ही 'अवनी' च्या खुनाची मोहीम राबवली।
राज्य सरकारची ह्या बाबतची भूमिका पहिल्यापासून संशयास्पद राहिली आहे। सरकारचे असे म्हणणे आहे की तिने 15 लोक मारले। पुरावा काय?, व जे लोक मारले गेले ते खूप आत जंगलात, ज्याला core area म्हणतो तिथे सापडले। एखादे जनावर मग ती वाघीण असो वा दुसरे श्रापद, त्याच्या हद्दीत मनुष्य प्राणी घुसला तर हल्ला करणारच। स्वतःच्या संरक्षणासाठी हिंस्त्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही।
ह्या वाघिणीला बेशुद्ध करुन तिचे व तिच्या बचड्यांचे पुनर्वसन करता येणे सहज शक्य होते , तिला मारण्याची गरज नव्हती।
आता सरकार वर असा आरोप होत आहे की ही यवतमाळ ची फॉरेस्ट लँड आहे, 465 हेक्टर ची, ती बिर्ला ह्या उद्योग समूहाच्या घशात घालायची आहे, सिमेंट फॅक्टरी साठी, जे काय असेल ते असो। सत्य बाहेर येईलच। जेवढे दाबाल तेवढे वर येते हा नियमच आहे।
आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होतीलच। कुणाचे हितसंबंध कुठे जोडले आहेत हे माहीत नाही।
ह्या हत्येचा सर्व स्तरातून , जगातून निषेध होत आहे। मुनगंटीवार यांनी त्वरित राजीनामा द्यावा व राज्य सरकार ने परत अश्या गोष्टी घडणार नाहीत अशी ग्वाही देऊन जनतेची जाहीर माफ़ी मागावी हिचं अवनी ला श्रध्दांजली।।

Avni popularly known as T1 was brutally killed by Shafat Ali, the paid contract killer. Appointed by Maharashtra government, India. Actually order was to tranquilized her and relocate. But with the help of corrupted government officials , he manage to kill her and still is at large. 

Signera petitionen
Signera petitionen
Du har JavaScript inaktiverat. Utan den skulle vår webbplats inte fungera korrekt.

sekretesspolicy

genom att skriva under accepterar du användarvillkor för Care2
Du kan hantera dina epostabonnemang när som helst.

Har problem med att skriva under detta? Låt oss veta.